Sunday, April 21, 2024
HomeCrimeचक्क 24 लाखांची दुचाकीने वाहतूक ; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

चक्क 24 लाखांची दुचाकीने वाहतूक ; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

Roughly 24 lakhs were transported illegally by bike
The local crime branch took custody

चंद्रपूर :- चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर दुचाकीने चक्क 24,75,000 रुपयांची बॅग मध्ये वाहतूक करणाऱ्या संशयीत व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. Police Raid

आज दिनांक 7 मार्च रोजी स्थानीक गुन्हे शाखेला Local Crime Branch Chandrapur गोपनिय माहिती मिळाली की, बल्लारशा कडून चंद्रपूरकडे एक इसम दुचाकीवर काळया बॅगमध्ये मोठया प्रमाणात नगदी रोकड घेवून येणार आहे. अशा खात्रीशीर खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेने बल्लारशा रोडवरील विसापूर टोलनाक्या समोरील वळणार सापळा रचून दुचाकीवर एक इसम पाठीवर बॅग लटकवून दुचाकीवर येतांना दिसता त्यास थांबवून त्याच्या बॅगची झडती घेतली असता बॅगमध्ये नोटांचे बंडल आढळून आले, यात 500 रुपयांच्या व 200 रुपयांच्या नोटांचे बंडल असे एकूण 24,77,000 रुपये संशयितरित्या आढळून आले. Crime News 

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याची चौकशी केली असता त्याचे नाव ज्ञानेश्वर रमेश चंनदबटवे, वय 34 वर्षे व्यवसाय आयुर्वेदीक शॉप रा.112 ईडब्युएस, नंदनवन, सदभावना नगर, प्लॉट नं. 112 नागपूर असे सांगीतले.

एवढया मोठ्या प्रमाणात नगदी रोकड मिळून आल्याने सदर रोकड त्याने चोरी किंवा अवैद्य मार्गाने प्राप्त केली असा संशयाने संशयितावर कलम 41 (1) (ड) दं.प्र.सं. अन्वये रोकड ताब्यात घेण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि. हर्षल एकरे, पोउपनि. विनोद भुरले, पो.हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. संतोष यलपुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपूरे यांनी केली असुन,

सदर रोकड बाबतचा तपास पो.उपनि. विनोद भुरले, स्था.गु.शा. चंद्रपूर हे करीत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular