The roofs of many houses were blown off by the stormy winds; MLA Subhash Dhote inspected the damaged houses
◆ तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना.
चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली (बु) परिसरात २१ एप्रिलला सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यामध्ये अनेकांच्या घरांचे छत उडाले, वीजखांब कोसळल्याने अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. गावातील अनेक मोठी झाडेही कोसळली. गावातील जवळपास ४०० घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

यामुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. आमदार सुभाष धोटे यांनी या परिसरात दौरा करून चिंचोली बु आणि परिसरातील नागरिकांच्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले आणि लवकरच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या परिसरातील सर्व नुकसानग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पुर्ण करून लवकरात लवकर शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड, धनराज चिंचोलकर, गोपाल डाहुले, मारुती नेवारे, दयानंद तावाडे, संभाशिव नागापुरे, अरुण सोमलकर, बंडू साखरकर यासह विद्युत विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.