Saturday, April 20, 2024
HomeEducationalजागतिक जल दिनी इको-प्रो कडून "नदी संवाद" कार्यक्रम : इरई व झरपट...

जागतिक जल दिनी इको-प्रो कडून “नदी संवाद” कार्यक्रम : इरई व झरपट नदी संवर्धनकरिता कृती कार्यक्रम राबविणार – इको-प्रो

River Dialogue’ Program by Eco-Pro on World Water Day.                                                      Action Program to be implemented for Irei and Jharpat River Conservation – Eco-Pro

◆ जागतिक नदी संवर्धन कृती दिन व जागतिक जल दिन निमित्त आयोजन.                                                        ● झरपट नदीच्या काठावर नदी संवाद कार्यक्रमातून नदी संवर्धनविषयी चिंतन, नद्यात येणारे सांडपाणी प्रमुख समस्या

चंद्रपूर :- आज 22 मार्च जागतिक जल दिनाच्या तसेच 14 मार्च जागतिक नदी संवर्धन कृती दिवस निमित्ताने इको-प्रो संस्था व विविध महाविद्यालयाच्या वतीने “नदी संवाद” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या काठावर असलेल्या अंचलेश्वर मंदिर लगत नदी पात्राच्या जवळ आयोजित नदी संवाद कार्यक्रमात नद्यांच्या प्रदूषणविषयी चिंतन करण्यात आले. यावेळी शहरातील सरदार पटेल महाविद्यालय, खत्री महाविद्यालय, एफ ई एस गर्ल्स महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, जनता महाविद्यालय आदी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विदयार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यंदाच्या जल दिन थीम “पाणी शांततेसाठी” तसेच नदी संवर्धन कृती दिन विषयी विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले. नदीत येणारे सांडपाणी, वाढलेली इकॉर्निया वनस्पती, टाकले जाणारे निर्माल्य, मृत जनावरे, महाकाली यात्रे दरम्यान येणारे भाविक, त्यांचेकडून दूषित पाण्यात आंघोळ करणे, नदीची जैवविवीधता, जलदिंन, पाण्याचे महत्व, जल पूर्णभरण, बंधारे आदी अनेक विषयावर विद्यार्थी-प्राध्यापक यांनी आपली विचार मांडले.

आजच्या “नदी संवाद” कार्यक्रम विषयी, इको-प्रो च्या रामाला तलाव संवर्धनाच्या मागण्या करिता करण्यात आलेले सत्याग्रह, संघर्ष नंतर शासन प्रशासनाच्या पुढाकाराने आता प्रयत्न सुरू झाले असल्याने, इको-प्रो आता शहरातील जीवनदायिनी इरई व झरपट नदी संवर्धनाच्या तसेच प्रदूषणमुक्त व सांडपाणीमुक्त करण्यासाठी आग्रह धरला जाणार असून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याकरिता शहरातील झरपट व इरई नद्या संवर्धनकरिता सातत्याने कार्य करण्यास, दवाबगट निर्माण करणे, लोकजागृती करणे, लोकसहभाग मिळविणे, नद्या स्वच्छ कश्या राहतील यासाठी सर्वांनी सर्व पातळीवर कार्य करणे, लोकसहभाग प्राप्त करणे हे प्रमुख उद्देश असेल.

यासाठी कृतिशील कार्यक्रम तयार करण्यास आज नागरिक, पर्यावरणवादी, प्राध्यापक व विदयार्थी यांनी “नदी संवाद” कार्यक्रमात भाग घेत कृती कार्यक्रम तयार करण्यास महत्वाचा सहभाग घेतला. नदी संवाद कार्यक्रमात नागरिक, प्राध्यापक व विदयार्थी यांनी सहभाग घेत विविध विषयांवर चर्चा केली, सर्वप्रथम गोंडकालीन इतिहासात नद्यांचा उल्लेख व आजची परिस्थिती यावर बंडू धोतरे यांनी माहिती दिली. त्यानंतर प्रा संतोष कावरे, प्रा राजेंद्र बारसागडे, प्रा नितीन रामटेके, डॉ पालीवाल, प्रा दिलीप बावणे, प्रा संयोग गेडेकर, प्रा रवी वाळके, प्रा निखिल देशमुख, प्रा कुलदीप गौड, प्रा राजकुमार बिराजदार, प्रा. पुरुषोत्तम माहोरे, प्रा अशोक बनसोड, प्रा प्रज्ञा जुनघरे यांनी आपले मत मांडले. या कार्यक्रमास प्रा पायल बांबोळे, प्रा पूजा धुर्वे व इको-प्रो चे नितीन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, राजू काहिलकर, सुनील मिलाल, अशोक क्षीरसागर, मनीष गावंडे, अब्दुल जावेद, योजना धोतरे, विशाखा लिपटे, शारदा काहिलकर इको-प्रो चे अनेक सदस्य व शेकडो विदयार्थी सहभागी झाले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular