Rice otherwise Money pay ; Senior electrical technician arrested while accepting bribe
चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील मौजा नवेगाव येथील शेतकऱ्याच्या शेतात विद्युत पंपाला नियमित विद्युत पुरवठा करण्यासाठी तक्रारदार तसेच गावातील शेतकऱ्यांना प्रती 20 किलो तांदूळ किंव्हा प्रत्येकी 1500 रुपयांची मागणी करणाऱ्या विरुर येथील एमएसईबी कार्यालयातील वरीष्ठ विद्युत तंत्रज्ञ शालेंद्र देवराव चांदेकर यांना 5000 रुपयांची लाच स्विकारताना Anti Corruption Beuro लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. Bribe for Electricity Supply
तक्रारदार हे मौजा नवेगावं, ता. राजुरा येथील रहीवासी असुन शेती व्यवसाय करतात. तक्रारदार यांची मौजा केळझर येथे शेती असुन शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची सोय करण्यात आलेली असुन सदर पंप सुरू करण्यासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू असणे आवश्यक असते. तक्रारदाराप्रमाणे गावातील ईतर शेतकऱ्यांकडे विद्युत पंपाची सुविधा आहे. तक्रारदार व ईतर शेतक-यांचे शेत विरूर (स्टे.) येथील एम.एस.सी.बी. कार्यालय अंतर्गत येत असुन शेतातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचे काम आरोपी वरीष्ठ विद्युत तंत्रज्ञ लोकसेवक यांचेकडे आहे. Senior Electrical Technician in MSEB office
आरोपी वरीष्ठ विद्युत तंत्रज्ञ हे प्रत्येक वेळी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यावरून पैशाची मागणी करून तक्रारदार व ईतर शेतकऱ्यांना सतत त्रास देत असत.
वरीष्ठ विद्युत तंत्रज्ञ लोकसेवक यांनी मागील तीन दिवसांपासून केळझर परिसरातील तक्रारदार व ईतर शेतकऱ्यांचे शेतातील विद्युत पुरवठा बंद करून ठेवला.
याबाबत तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक यांचेसोबत मोबाईलवर बोलणी केली असता विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू करायचा असेल तर प्रत्येकी 20 किलो तांदूळ किंवा प्रत्येकी 1500/- रू. असे एकुण 7500/-रू. वरीष्ठ विद्युत तंत्रज्ञ लोकसेवक यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी ला.प्र.वि. चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी लोकसेवक शालेंद्र देवराव चांदेकर, वरिष्ठ तंत्रज्ञ, विरूर (डि.सी.), उपविभाग राजुरा, ता. राजुरा, जि. चंद्रपूर यांनी तक्रारदार यांना तडजोडीअंती 5000/-रु. लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून 5000/-रू. लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली.
त्यावरून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक वरीष्ठ विद्युत तंत्रज्ञ यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.
सदर कार्यवाही श्री. राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर तसेच पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, ना.पो.अं. रोशन चांदेकर, पो.अं. प्रदिप ताडाम, म.पो.अं. मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले यांच्या वतीने करण्यात आले आहे. Appeal from Chandrapur ACB