Sunday, March 23, 2025
Homeजिल्हाधिकारीवणी व आर्णी मतदारसंघातील निवडणूक तयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा ; मतदान केंद्र व...

वणी व आर्णी मतदारसंघातील निवडणूक तयारीचा जिल्हाधिका-यांकडून आढावा ; मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी

Review of election preparations in Vani and Arni constituencies by Chandrapur District Collector
Inspection of polling station and strong room.  Instructions for following a model code of conduct

◆ मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी
● आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या सुचना
चंद्रपूर :- आगामी लोकसभा निवडणूक– 2024 च्या पार्श्वभुमीवर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या वणी व आर्णी (जि. यवतमाळ) येथील निवडणूक तयारीचा आढावा घेतला तसेच मतदारसंघातील मतदान केंद्र व स्ट्राँग रुमची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज अर्शिया उपस्थित होते.

उपविभागीय कार्यालय वणी येथे वरील दोन्ही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी याशिनी नागराजन तसेच उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांच्यासह मतदार संघातील उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार व नोडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सदर आढावा सभेत लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यात मतदारसंघात राबविण्यात येणाऱ्या स्वीप ऍक्टिव्हिटी अंतर्गत मतदान जनजागृती व मतदार नोंदणी, नव मतदारांची नोंदणी, मयत व स्थलांतरित नावे कमी करणे, यादी शुद्धीकरण, महिलांचा सहभाग तसेच मतदानाची टक्केवारी वाढवणे यावर चर्चा करण्यात आली. वंचित घटक जसे तृतीयपंथी, देहविक्री करणा-या स्त्रिया, भटक्या जाती जमातीतील व्यक्ती, आदिवासी यांचे समावेशन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यावरसुध्दा चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मतदान केंद्रातील पायाभूत सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रे, मागील निवडणुकांमधील निवडणूक संदर्भातील दाखल झालेले गुन्हे व झालेली कारवाई तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाची प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत संबंधित अधिका-यांना सुचना दिल्या. तसेच भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या विविध सूचना यांची अंमलबजावणी करणे आणि आदर्श आचारसंहितेचे पालन करणे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. एकाच इमारतीमध्ये पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या इमारती तसेच स्ट्राँग रुम आणि डिस्पॅच हॉलला त्यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व त्यासंबंधी करावयाच्या उपाययोजना याविषयी निर्देश दिले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular