Sunday, April 21, 2024
Homeउद्योगहंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात सिध्दबली इस्पातमधील प्रलंबित प्रश्नी आढावा बैठक

हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात सिध्दबली इस्पातमधील प्रलंबित प्रश्नी आढावा बैठक

Review meeting on pending questions in Siddhabali Ispat under the guidance of Hansraj Ahir

चंद्रपूर :- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सिध्दबली इस्पात प्रकल्पातील विविध प्रश्न, समस्या, कामगारांच्या अडचणी, प्रकल्पात होणारे अपघात व अन्य महत्वपुर्ण विषयांवर जिल्हा नियोजन भवन येथे आढावा बैठक घेतली.

दि. २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा, निवासी जिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, पुनर्वसन अधिकारी अतूल जटाळे व अन्य विभाग प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकीत हंसराज अहीर यांनी सिध्दबली कंपनीशी निगडीत अनेक विषयांचा आढावा घेतला. कंपनीतील विविध बाबींचा तपास करण्यासाठी समितीचे गठण झाले असतांनाही कार्यवाही का होत नाही अशी विचारणा केली.

कामगारांना योग्य सोयीसुविधा पुरवल्या जातात काय ? त्यांच्या सुरक्षिततेची निगा राखली जाते काय ? त्यांच्या अडचणी काय ? या व अन्य समस्यांच्या निराकरणासाठी तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती असतांनाही ती आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडतांना दिसत नाही असेही अहीर म्हणाले. या कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे ४ परप्रांतिय कामगारांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनी प्रबंधनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना केली. या कंपनीमध्ये कामगारांना कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नाही याची गांभीर्याने दखल घेत कामगारांना सोयी-सुविधा पुरविण्याच्या सुचना केल्या. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने यापुर्वी कार्यरत कामगारांची कागदपत्र तपासणी करावी. एकुण ८९ कामगारांपैकी २२ कामगार ५० वर्षांच्या आत असल्याची माहिती कंपनी प्रबंधनाव्दारा देण्यात आली.

कामगार कार्यालयाने वस्तुस्थिती तपासून सर्व ८९ कामगारांना अंतिम देय राशी देण्यात आल्याबाबत शहानिशा करावी तसेच कंपनी बंद झाल्यापासून पूर्ववत सुरु होईपर्यंतचा अंतिम राशी किती देण्यात आली किंवा नाही याबाबतचा संपूर्ण अहवाल १० दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश हंसराज अहीर यांनी या आढावा बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, माजी आमदार संजय धोटे, खुशाल बोंडे, नरेंद्र जीवतोडे, राजू घरोटे, तहसीलदार पवार, कामगार अधिकारी, कंपनीचे गुप्ता, हेमराज देशमुख व अन्य अधिकारी, धनंजय पिंपळशेंडे, अंकुश आगलावे, अॅड. प्रशांत घरोटे व कामगार बांधव उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular