Thursday, November 30, 2023
Homeराजकीयचंद्रपूर महिला काँग्रेस ची विस्तारित कार्यकारिणी ची आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर महिला काँग्रेस ची विस्तारित कार्यकारिणी ची आढावा बैठक संपन्न

review meeting of the extended executive of Chandrapur Mahila Congress was concludedचं चंद्रपूर :- जिल्हा महिला काँग्रेस च्या विस्तारित कार्यकारीणी ची आढावा बैठक ११ ऑक्टोबर ला स्थानीक श्रमिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने महिला संघटन मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांकडून यावेळी महिला काँग्रेस कडून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकिला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे Mla Subhash Dhote प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी, महिला शक्ती मोठी असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला निर्णायक भूमिका पार पडणार आहे.असे प्रतिपादन केले. त्याच सोबत महिला शक्ती मोठी आहे.त्याचाच उपयोग भाजप सरकार घेत असून महिलांची दिशाभूल करत आहे. महिलांच्या साठी 33% आरक्षण विधेयक मोदी सरकारने पारित केले पण ते कधीपासून लागू होईल या बाबत अनिश्चितता आहे. महागाई, महिलांच्या वरील अत्याचार खूप वाढले आहे. त्यामुळे महिलांनी संघटन करून सामान्य महिलांमध्ये याबाबत जागरूकता केली पाहिजे असे आवाहन देखील सुभाष धोटे यांनी यावेळी केले. Review meeting of the extended executive of Chandrapur Mahila Congress was concluded

जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी उपस्थित सर्व महिलांना नव्याने कमिटया स्थापन करा. प्रत्येक तालुक्यात जितक्या ग्रामपंचायती असतील तितक्या गाव कमिटया स्थापन करून “गाव तिथे काँग्रेस” हे अभियान सुरू करा असे आवाहन केले. तालुक्यातील सर्व बूथ वर महिलांच्या बूथ कमीटया स्थापन करून “मेरा बूथ सबसे अच्छा” ही स्पर्धा पदाधिकाऱ्यांनी आपसात निर्माण केली पाहिजे, तेव्हाच महिला संघटन मजबूत होईल असे प्रतिपादन केले.

या आढावा बैठकीत नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular