Review meeting of Shiv Sena was held in Chandrapur in the background of upcoming assembly elections
चंद्रपूर :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) चंद्रपूर विधानसभेची आढावा बैठक आज पत्रकार भवन येथे पार पडली. बैठकीचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर शिवसेना निवडणूक प्रभारी आमदार कृपाल जी तुम्हाणे साहेब व निरीक्षक डॉ.मनीषा ताई कायंदे यांच्या प्रमुख उपस्तिथीत झाली.
बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा बद्दल माहिती घेण्यात आली, महानगर प्रमुख भरत गुप्ता यांच्या नेतृत्वात गरजू व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते ताडपत्री वाटप करण्यात आले, तसेच महिलांचा प्रवेश ही घेण्यात आलेत.
या बैठकीत आमदार कृपाल जी तुम्हाणे, डॉ मनीषा ताई कायंदे, पूर्व विदर्भ सचिव,युवा सेना शुभमभाऊ नवले, संपर्क प्रमुख किशोर जी राय, लोकसभा निरीक्षक हर्षलभाऊ शिंदे, जिल्हा प्रमुख नितीन भाऊ मत्ते, बंडू भाऊ हजारे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकुर, मीनल आत्राम, विनोद बुटले, माया ताई मेश्राम, वाणी सदालावार, सुनीता गोवर्धन, श्रेयांश ठाकुर, राकेश बहुरीया, नयन जंगम, आदित्य यादव व पदाधिकारी उपस्थित होते.