Tuesday, March 25, 2025
HomeEducationalआश्रमशाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्‍काळ सोडवा : आमदार सुधाकर अडबाले

आश्रमशाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या तात्‍काळ सोडवा : आमदार सुधाकर अडबाले

Resolve the problems of teachers and non-teaching staff in ashram schools immediately: MLA Sudhakar Adbale     Other Backward Bahujan Kalyan, Problem Solving Meeting at Chandrapur

चंद्रपूर :- इतर मागास बहुजन कल्याण विभागातील आश्रमशाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्‍या सर्व समस्‍या तात्‍काळ निकाली काढा तसेच ओबीसी वसतिगृह प्रवेशासाठी व आधार योजनेबाबत तात्काळ अर्ज प्रकिया सुरू करा, अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी सहाय्यक संचालकांना दिल्‍या.

‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत दिनांक १३ जून २०२४ रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागातील आश्रमशाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ समस्‍या निवारण सभा सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, चंद्रपूर यांच्याकडे घेण्यात आली.

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा एक तारखेला अदा करण्यात यावे, वेतन बिल उशिरा पाठविणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, भविष्य निर्वाह निधी हिशोब चिठ्या देण्यात याव्‍या, वरिष्ठ/निवड श्रेणी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावे, जिल्ह्यातील अतिरिक्‍त शिक्षकांचे ज्‍येष्ठतेनुसार समायोजन करण्यात यावे व इतर विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ही सर्व प्रलंबित प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्याचे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी सहाय्यक संचालकांना दिल्‍या. तसेच या सभेतील सर्व विषयांवर ऑगस्ट महिन्‍यात आढावा सभा घेणार असल्‍याचे अधिकाऱ्यांना सांगितले.

ओबीसी वसतिगृहाच्या सद्यस्‍थितीबाबत चर्चा करण्यात आली. वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत सूचना दिल्‍या. तसेच आधार योजनेचा प्रचार-प्रसार विभागाच्या वतीने करण्यात यावा. शाळा-महाविद्यालयांत बैठका घेऊन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात यावी, अशा सूचना आमदार अडबाले यांनी दिल्‍या.

यावेळी सहाय्यक संचालक आशा कवाडे, जगदीश जुनगरी, लक्ष्मणराव धोबे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, विमाशि संघ आश्रम शाळा विभाग चंद्रपूरचे जिल्‍हाध्यक्ष डी. बी.गोखरे, जिल्हा कार्यवाह किशोर नगराळे, विमाशिचे कोषाध्यक्ष दिगांबर कुरेकर, शहर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, डॉ. विजय हेलवटे, प्रकाश कुंभारे, प्रा. ज्ञानेश्‍वर सोनकुसरे व आश्रम शाळा विभागाचे पदाधिकारी, सदस्‍य व समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular