Reserve 10 percent seats for military school students from Chandrapur district
MP Pratibha Dhanorkar demands from Defense Minister Rajnath Singh
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- जिल्ह्यातील बल्लारपूर रोड वर असणाऱ्या सैनिकी शाळेत Military School देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. केंद्र व राज्य सरकार च्या उपक्रमातून चालविण्या जाणाऱ्या या शाळेत उच्च दर्जाचे अधिकारी घडविण्यासाठी शिस्तबध्द रित्या शिक्षण दिले जाते. सदर शाळेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के कोटा राखीब ठेवण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह Defense Minister Rajnath Singh यांचे कडे केली आहे. Reserve 10 percent seats for military school students from Chandrapur district
बल्लारपूर रोड वरील सैनिकी शाळेत प्रवेशाकरीता प्रवेश परिक्षा घेतली जात असते. यामध्ये 100 जागेवरील प्रवेशाकरीता 15 जागा अनुसूचित जातीकरिता, 8 जागा अनुसुचित जमाती करीता तर उर्वरीत 77 जागेपैकी 67 टक्के जागा म्हणजे 52 जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. या 52 जागेतील 25 टक्क्यातील राखीव 13 जागा या माजी सैनिक तसेच सैनिकी शाळेतील शिक्षकांच्या पाल्यासाठी राखील आहेत. उर्वरीत 39 जागांवर सामान्य विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने प्रवेशीत जागांपैकी 10 टक्के राखील जागा या चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात समोरील अधिवेशनात तारांकीत प्रश्नाद्वारे देखील मागणी करणार असल्याची माहिती खासदार धानोरकर यांनी दिली आहे. MP Pratibha Dhanorkar demands from Defense Minister Rajnath Singh
चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या सैनिकी शाळेतून जास्तीत जास्त अधिकारी भविष्यात घडावेत यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे देखील खासदार धानोरकर यांनी सांगितले आहे.