Republic day celebration in Chandrapur circle of Msedcl Mahavitran
चंद्रपूर :- भारतीय गणराज्याचा प्रजासत्ताक दिन महावितरणच्या Msedcl चंद्रपूर परिमंडळात आज उत्साहाने साजरा करण्यात आला. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले व सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी ध्वजास मानवंदना अर्पण केली.
प्रजासत्ताक दिन साजरा करीत मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी संविधान -उददेशिकेचे वाचन केले.याप्रसंगी, अधीक्षक अभियंता श्रीमती. संध्या चिवंडे, सहा.महाव्यवस्थापक श्री. रामचंद्र बैदकर
कार्यकारी अभियंता~ श्री. विजय राठोड, श्री. चंद्रशेखर दारव्हेकर, श्री. वसंत हेडाऊ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्य अभियंता यांचे हस्ते परिमंडळ कार्यालयात व अधीक्षक अभियंता यांचे हस्ते वृक्षारोपण पार पडले तसेच
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून परिमंडळ अंतर्गत विभाग,उपविभाग व अनेक शाखा कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.