Remove encroachment on Shengaon bus stand; Demand of BRS to Tehsildar of Jivati Taluka
चंद्रपूर :- शेनगाव बस स्थानकावरील अतिक्रमण तात्काळ हटवा अशी मागणी BRS भारत राष्ट्र समिती चे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात शेनगाव वासीयांनी जीवती तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जिवती तालुक्यातील शेणगाव येथील बस स्थानकाच्या जागेवर मागील 2 वर्षापासून अवैध अतिक्रमण करण्यात आलेले आहे त्यामुळे हजारो प्रवाशी व नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच शेणगाव हे रहदारीचे ठिकाण असल्यामुळे येथे तेलंगाणा राज्यातून दिवसातून दोन- तिन वेळा बसेसची ये-जा होत असते त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक बसेस येथे थांबत असतात. या सर्व बसेस रस्त्यावर थांबल्यावर वाहतुकीची कोंडी व अपघाताची शक्यता वाढत आहे.
करीता शेनगाव बस स्थानकावरील विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेणगाव येथील अवैध अतिक्रण तात्काळ हटविण्याचे करावे अशी मागणी करण्यात आली, पुढील 5 दिवसात सकारात्मक उत्तर व कायदेशीर कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी बीआरएस राजुरा विधानसभेचे नेते भूषण फुसे, शिवाजी शिवमोरे, शिवाजी पवार, बालाजी मोरे, सुभाष हजारे, संभाजी मुंगळे, नामदेव कोडापे, माधव गायकांबळे, विसांबर साबणे आदी बीआरएस कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.