Release Arvind Kejriwal from jail immediately AAP office bearer’s letter to President written in blood
चंद्रपूर :- आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Delhi CM Arvind Kejriwal यांना लोकसभा निवडणुकीच्या Loksabha Election तोंडावर प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी मोठ्या षड्यंत्राने तुरुंगात टाकण्यात आले आहे. त्यांची तुरुंगातून तात्काळ मुक्तता करण्यात यावी या मागणीसाठी AAP आम आदमी पार्टी बल्लारपूर चे उपाध्यक्ष सय्यद अफजल अली यांनी आपल्या रक्ताने President of India राष्ट्रपतींना पत्र लिहिले. शैक्षणिक दाखल्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारल्यास तक्रार करा
सदर निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीकडे पाठविण्यात आले.

निवेदन सादर करतांना आपचे बल्लारपूर शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, उपाध्यक्ष अफजल अली, सचिव ज्योतीताई बाबरे, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, रेखा भोगे, गीताताई इत्यादीं कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.