Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्र राज्यओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद ; राज्य सरकारचे अभिनंदन : डॉ....

ओबीसी विभागासाठी ३३७७ कोटींची विक्रमी तरतूद ; राज्य सरकारचे अभिनंदन : डॉ. अशोक जीवतोडे*

Record provision of 3377 crores for OBC section: Congratulations to the state government – Dr.  Ashok Jivatode

चंद्रपूर :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ३३७७ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे हा निधी मंजूर करण्यात आला. यासाठी राज्यसरकारचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी अभिनंदन केले आहे.

या मंजुरीनंतर ओबीसी विभागाचे २०२३-२४ च्या राज्य योजनांसाठी एकूण तरतूद ७८७३ कोटी इतकी झाली आहे. एका वर्षांसाठी झालेली ही विक्रमी तरतूद असून मागील वर्षाच्या तुलनेत ३०८१ कोटीं अधिक आहेत.
यामध्ये मोदी आवास योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. महाज्योतीसाठी २७९ कोटी, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी १५८ कोटी, धनगर समाजाच्या योजनांसाठी ५६ कोटी, अमृत संस्थेसाठी १५ कोटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीक पूर्व व मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ११९२ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय राज्य मागासवर्ग आयोग ३६० कोटी, ओबीसी व व्हीजेएनटी महामंडळासाठी २० कोटी अशा विविध योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
यामुळे ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामूहिक विकास कामांसाठी हातभार लागेल, असा विश्वास या विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

राज्य सरकारच्या या ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गाकरीता भरीव कामगिरी करीता डॉ. अशोक जीवतोडे यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular