Thursday, February 22, 2024
Homeजिल्हाधिकारीजिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

Reading of the Constitution Preamble at the Collector’s Office

चंद्रपूर :- संपूर्ण देशभर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयात या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी भारतीय संविधानातील नागरीकांच्या मुलभुत कर्तव्याच्या जागरुकतेसाठी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालय येथे संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले.

या निमित्त शाळा व महाविद्यालयांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करुन भारतीय संविधानात दिलेल्या नागरिकांचे मुलभुत हक्क, कर्तव्ये व जबाबदाऱ्या याबाबत जनजागृती करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular