Sunday, December 8, 2024
HomeCrimeघरफोडी, वाहनचोरीच्या अट्टल गुन्हेगारासअटक : 8 वाहनांसह दागिने जप्त
spot_img
spot_img

घरफोडी, वाहनचोरीच्या अट्टल गुन्हेगारासअटक : 8 वाहनांसह दागिने जप्त

Ramnagar Police Arrested a Prominent Criminal of Burglary, Vehicle Theft:               8 Vehicles and Gold and Silver Jewelery Seized

चंद्रपूर :- रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास रामनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, आरोपीकडून 8, दुचाकी वाहन व घरफोडीच्या गुन्ह्यात चोरी गेलेले सोने चांदीचे दागिने असा एकूण 2,96,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Chandrapur Crime

शहरातील पागलबाबा नगर येथील खुर्शीदा बानू रहीम शेख आपल्या परिवारासह नातेवाईकांकडे दिनांक 4 मे रोजी लग्नाला गेले आणी 7 मे रोजी परत घरी आले असता दुचाकी पॅशन प्रो दिसून आली नाही तसेच
घराचा मागील दरवाज्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले, दरम्यान घरात प्रवेश केला असता घरातील 3 लोखंडी आलमारी फोडून आलमारीतुन सोन्याचे नेकलेस, टॉप्स, मंगळसूत्र, मनी, डोरले, अंगठी चोरी गेल्याचे निदर्शनास आले यावरून खुर्शीदा शेख यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Burglary, Vehicle Theft

रामनगर पोलीसांनी Ramnagar Police Station तपासाची चक्रे फिरवीत तांत्रिक व मुखबि्रांकडून तपास सुरु असतांना शहरातील जुनोना चौक परिसरात एक युवक दुचाकी विकायला फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली दरम्यान रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सदर आरोपी युवकाला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवीत विचारपूस केली असता आरोपी निखिल अनिल मैकलवार,वय 24 वर्ष, रा. बल्लारपूर, सध्या राहणे जुनोना चौक याला अटक केली. Ramnagar Police Arrested a Prominent Criminal of Burglary, Vehicle Theft
आरोपी निखिल मैकलवार याने एका विधी संघर्ष बालकासोबत रामनगर पोलीस स्टेशनपरिसर, बल्लारपूर, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन परिसर व नागपूर परिसरातील वेगवेगळ्या ठिकानांतुन मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले.

यावरून रामनगर पोलिसांनी एकूण 8 मोटर सायकल व सोने चांदीचे दागिने असा एकूण 2,96,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पोलीस निरीक्षक यशवंत कदम, गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, पोउपनि मधुकर सामलवार, दीपेश ठाकरे, पोहवा पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, प्रशांत शेंदरे, आनंद खरात, लालू यादव, हिरालाल गुप्ता, रविकुमार बेंगळे, संदीप कांबळी, विकास जुमनाके, विकास जाधव, पंकज ठोँबरे व मनीषा मोरे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular