Sunday, December 8, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनरामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याने सामाजिक एकोपा वाढविला - डॉ. अशोक जीवतोडे : विदर्भवादी...
spot_img
spot_img

रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याने सामाजिक एकोपा वाढविला – डॉ. अशोक जीवतोडे : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन संपन्न

Ramlalla Pran-Pratishtha ceremony increased social harmony – Dr.  Ashok Jeevtode : Vidarbha OBC leader Dr.  Organized various religious and social programs under the leadership of Ashok Jivtode

श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथील रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळा चंद्रपुरात आनंदात साजरा

पूजापाठ, बुंदी वाटप व फटाक्यांच्या जल्लोषात जय श्रीरामाचा एकच जयघोष

चंद्रपुर :- श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथील रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्सवाचे व उत्साहाचे वातावरण होते. या उत्सवात व उत्साहात विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी सक्रिय सहभाग घेत सिव्हील लाईन चौकात भक्तिमय वातावरण निर्माण केले. आठवडा भरापासूनच साफ स्वच्छता, राम-धून, हनुमान मंदीरात पूजापाठ आदी उपक्रमातून रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याचे उत्साही व धार्मिक वातावरण तयार केले.

आज (दि.२२) ला विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात श्री राम जन्म भूमी मंदिर, अयोध्या येथे रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त, स्थानिक सिव्हील लाईन चौकातील पुरातन हनुमान मंदीरात दिपप्रज्वलन, पुजा, अर्चना, होम, हवन, प्रार्थना, रामधुन करण्यात आली तथा स्थानिक सिव्हील लाईन चौकात बुंदी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परिसरातील या भक्तिमय वातावरणात शेकडो जनतेनी सहभाग नोंदविला व महाप्रसादाचा लाभ घेतला. १२:२० ला रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा होताच फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. जय श्रीरामचा एकच जयघोष परिसरात घुमू लागला. अत्यंत उत्साही व प्रसन्न वातावरणात सामाजिक एकोपा वाढवून दीपोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा सोहळ्याने सामाजिक एकोपा वाढविला आहे. मनामनात असलेला राम माणसा माणसात मर्यादा व प्रेम वृध्दिंगत करीत आहे. संपूर्ण देश आज एक होवून जगाला भक्ती व शांती अर्पण करीत असल्याचे चित्र आहे.

यावेळी डॉ. अशोक जीवतोडे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular