Ram devotees leave for Ayodhya by special train; 400 Ram devotees welcomed by Hansraj Ahir
चंद्रपूर :- पुण्यभुमी अयोध्या येथे प्रभु श्रीरामचंद्रांच्या दर्शनाकरीता चंद्रपूर येथून रेल्वेने जाणाऱ्या ४०० प्रवाश्यांच्या जत्थ्याचे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. दि. २० फेब्रुवारी रोजी बल्लारशाह-अयोध्या स्पेशल ट्रेन (नं. ००१५९) ने हे रामभक्त अयोध्येला रवाना होत असल्याने अहीर यांनी रात्री १२.१५ वाजता चंद्रपूर रेल्वेस्टेशनवर पोहचून या सर्वांना सुखद यात्रेकरीता शुभेच्छा देवून स्वागत केले.

याप्रसंगी मनपाचे माजी सभापती रविंद्र गुरनूले चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीचे तसेच ZRUCC चे सदस्य दामोदर मंत्री, नरेंद्र सोनी, पुनम तिवारी, श्याम सारडा, अनिष दिक्षीत, संजय मंघाणी, किशोर बंदावार, रितेश वर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या अधिकाऱ्यांनीही अयोध्येस जाणाऱ्या या रामभक्तांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. रात्री ०१.१० मिनीटांनी सर्व रामभक्त अयोध्येकरीता रवाना झाले. यावेळी उपस्थित रामभक्त व मान्यवरांनी भारत माता की जय व जय श्रीराम चे नारे देवून रेल्वे स्थानकाचा परिसर निनादून सोडला.