Will fight against the establishment with the banner of the deprived; Assertion of Chandrapur Loksabha vba candidate Rajesh Belle
चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, या निवडणुकीत मी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणुक लढवित आहे. माझ्यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळु सरकत चाललेली आहे. त्यामुळे आता माझ्या बदनामीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेश बेले यांनी केला आहे. https://youtu.be/IWykvwJb7y8?si=ItfAu16o2NO6shYH
बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजनांना आम्ही संसंदेत घेवुन जाऊ हेच आमच धोरण आहे आणि ते धोरण या आमच्या सगळ्या वंचित बहुजनांनी स्विकारलेल आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची वेळ आल्याने विविध माध्यमातुन माझी बदनामी करण्यात येईल. मी कोणत्याही आरोप प्रत्यारोपांना न घाबरता प्रस्थापितांच्या विरोधात वंचितांचा झेंडा हातात घेवुन लढणार आहे, असे आवाहन राजेश बेले यांनी केले. VBA

प्रस्थापित पक्षांनी या राज्यात भ्रष्टाचाराचे राजकारण केले. ईडीचा भय दाखवून छोट्या पक्षांना फोडून त्यांना भाजपमध्ये आणण्याचे काम सुरू आहे, जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रदुषणात मोठया प्रमाणात वाढ होत आहे त्याचा बुरखा आम्ही काढणार आहोत, जगलात कोणते महोत्सव झालेत. बांबु कसे जळलेत व स्टेडीयम, बस स्टॅन्ड कसे कोसळलेत, हे जनतेसमोर मांडण्यात येईल असाही टोला त्यांनी लगावला. Loksabha Election 2024 https://youtu.be/IWykvwJb7y8?si=ItfAu16o2NO6shYH
चंद्रपूर सह यवतमाळ जिल्ह्यातील ही मतदार संघांमध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल प्रचंड अस्मिता निर्माण झाली असून, ओबीसी समाज आता एकत्र झालेला आहे यामुळे आम्ही विजय प्राप्त करू असे मत बेले यांनी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले. https://youtu.be/IWykvwJb7y8?si=ItfAu16o2NO6shYH
चंद्रपूर लोकसभेच्या प्रचारासाठी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर चंद्रपुरात प्रचार सभा आणि रोड शो करणार असल्याचेही माहिती बेले यांनी यावेळी दिली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कविता गौरकर, तनुजा रायपुरे, बंडू ठेंगरे, शुभम मंडपे, अक्षय लोहकरे, जयदीप खोब्रागडे, सतीश खोब्रागडे आदी असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती.