Publication of Organic/Natural Farming booklet
Extension activities of College of Agriculture
चंद्रपूर :- परंपरागत कृषी विकास योजना व डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय/ नैसर्गिक शेती मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा तथा प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय चंद्रपूर यांच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण साहित्य म्हणून सेंद्रिय/ नैसर्गिक शेती संकल्पना आणि व्यवस्थापन या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जिल्हा चंद्रपूर यांच्या हस्ते आज दिनांक 10 मे रोजी करण्यात आले. Publication of Organic/Natural Farming booklet
शासनाच्या वतीने सेंद्रिय/नैसर्गिक शेती च्या बळकटीकरणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबविण्यात येत असून PKV Natural Farming Mission चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ATMA प्रकल्प संचालक आत्मा तथा आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा Agricultural Collage यांच्या वतीने शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीतील विविध संकल्पनांच्या स्पष्टीकरणाकरिता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले असून या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षण साहित्य म्हणून सेंद्रिय / नैसर्गिक शेती संकल्पना आणि व्यवस्थापन या पुस्तिकेचे प्रकाशन आज दिनांक 10 मे 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. Organic/Natural Farming
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक जॉन्सन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शंकर तोटावार, प्रकल्प संचालक आत्मा सौ प्रीती हिरळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार तथा इतर कृषी अधिकारी उपस्थित होते.
सदर पुस्तिका तयार करण्याकरिता महाविद्यालयातील कृषी विद्या शाखेचे डॉ.व्ही. व्ही. पाटील, डॉ. आर. व्ही. महाजन, डॉ. एस आर इमडे आणि कु. वैशाली पुसदेकर तथा इतर विषय तज्ञ तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.
सदर पुस्तिकेमध्ये सेंद्रिय/ नैसर्गिक शेतीमधील अनेक संकल्पना, मूलतत्वे तसेच विविध पद्धती वर मार्गदर्शन विषय तज्ञांद्वारे करण्यात आलेले असून नैसर्गिक/सेंद्रिय शेतीच्या प्रचार प्रसारा करिता ही पुस्तिका मार्गदर्शी ठरेल असा विश्वास सन्माननीय जिल्हाधिकारी श्री विनय गौडा यांनी प्रकाशन प्रसंगी व्यक्त केला.
या पुस्तकाचे प्रकाशन माही प्रकाशन अहमदाबाद यांनी केलेले असून मुखपृष्ठ कल्पना श्री रवींद्र बनकर, ग्रंथपाल कृषी महाविद्यालय वरोरा यांनी रेखाटलेली आहे.