Public protest of MP Rahul Gandhi on behalf of Kamal Sporting Club in Chandrapur
चंद्रपूर :- लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसद सभागृहात कॉग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी Opposition leader Rahul Gandhi यांनी देशातील हिंदुना हिंसक प्रवृत्तीचे ठरवून समस्त हिंदुंचा अपमान केला असून संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींने साऱ्या हिंदु समाजाला हिंसाचारी ठरविल्याने राहुल गांधीचा जाहीर निषेध करुन त्यांनी सकल हिंदु समाजाची लोकसभेच्या सभागृहातून माफी मागावी अशी मागणी कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांनी केली आहे. Public protest of MP Rahul Gandhi
चंद्रपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दि. 3 जुलै, 2024 रोजी आयोजित निषेध कार्यक्रमात संबोधित करताना रघुवीर अहीर म्हणाले की, हिंदुंच्याच नव्हे तर सर्व जाती धर्म व पंथांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सनातन चिरंतन मुल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे त्यांच्या परंपरांचा सन्मान राखण्याचे व बंधुभाव जोपासण्याचे कर्तव्य हिंदु समाजाने सातत्याने केले असतांना हिंदुंना हिंसक अशी उपमा देवून राहुल गांधींनी सकल हिंदूंचा अपमान केला असून नैतिकता दाखवून त्यांनी माफी मागून प्रायश्चित घ्यावे असेही रघुवीर अहीर म्हणाले.
यावेळी कॉग्रेस नेते राहुल गांधींच्या निषेधाचे बॅनर झळकवून जय श्रीराम, जय शिवराय चे नारे देण्यात आले. हिंदुना हिंसक ठरविणारे राहुल गांधी-मुर्दाबाद, राहुल गांधींचा निषेध असो अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या.
यावेळी राजवीर चौधरी, मयुर भोकरे, जगदीश दंडेले, शिवाजी वाकोडे, प्रणय डंभारे, चेतन शर्मा, संगम दहागावकर, राकेश वाकोडे, आशिष जामुनकर, आश्रय चंदनखेडे, सुमित बाकरवाले, प्रज्वल गिलबिले यांचेसह अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.