Sunday, December 8, 2024
HomeLoksabha Electionपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात जाहीर सभा
spot_img
spot_img

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपुरात जाहीर सभा

Public meeting of Prime Minister Narendraji Modi in Chandrapur

चंद्रपूर :- चंद्रपूर- वणी-आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे हात बळकट करण्यासाठी देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी Prime Minister Narendra Modi उद्या सोमवार (दि. ८ एप्रिल २०२४) चंद्रपूर येथे येणार आहेत. Loksabha Election

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांना आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.

चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सायंकाळी ४ वाजता ही सभा होईल. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये ना. सुधीर मुनगंटीवार यांचा जनसंपर्काचा धडाका सुरू आहे. विकास कामे आणि चंद्रपूरच्या विविध घटकांच्या प्रगतीच्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात आल्यामुळे विशाल जनमत मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठिशी आहे. अशात देशातील गोरगरीब, शेतकरी, मजूर, महिला व तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून ‘मोदी की गॅरंटी’ देणारे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन होत असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून सर्वसामान्य जनतेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular