Public meeting of Nitin Gadkari to campaign for BJP candidate Sudhir Mungantiwar
चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी ०६ एप्रिल २०२४ रोजी राजुरा येथे सकाळी १०.०० वाजता व पांढकवडा (जि. यवतमाळ) येथे दुपारी १.०० वाजता केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. Loksabha Election 2024 Campaign
केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी Central Minister Nitin Gadkari यांच्या जाहिर सभेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मा. श्री. सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी केले आहे. Public meeting of Central Minister Nitin Gadkari to campaign for BJP candidate Sudhir Mungantiwar
देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पालकमंत्री म्हणून मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र विकास कामांचा तसेच अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचा धडाका लावून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलला आहे. प्रचार दौरे आणि सभांमधून त्यांच्या कामावर नागरीकही समाधान व्यक्त करून समर्थन देत आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळावी तसेच जिल्ह्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास यावेत, याकरिता विकासाला अर्थात मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना साथ देण्याचे आवाहन समर्थकांकडून करण्यात येत आहे.