Monday, November 11, 2024
Homeधार्मिकरिपाइंतर्फे 'संविधान बचाव देश बचाव' जनजागृती कार्यक्रम
spot_img
spot_img

रिपाइंतर्फे ‘संविधान बचाव देश बचाव’ जनजागृती कार्यक्रम

Public awareness program ‘Save Constitution, save Country’ by Republican party of India

चंद्रपूर :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या RPI वतीने राज्यस्तरीय अधिवेशन आणि संविधान बचाव, देश बचाव Save Constitution, Save Country या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रविवारी 7 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह नागपूर रोड चंद्रपर येथे करण्यात आल्याची माहिती चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई राहतील. तर उद्घाटन रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे राहतील.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. संविधानाने निर्माण केलेल्या न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्याची प्रस्थापना करून या मूल्यावर आधारित समाज निर्मिती करणे हा या पक्षाचा उद्देश आहे. परंतु, अलीकडे संविधानात बदल करण्याचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांकडून रचले जाते आहे. संविधानाला धोका निर्माण झाला आहे. हे संविधान वाचविणे काळाची गरज असून याची जनजागृती नागरिकांमध्ये करणे हा अधिवेशनाचा उद्देश असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला गोपाळ रायपुरे, रमेश जिवने, बाजीराव उंदिरवाडे, मोरेश्वर चंदनखेडे, कोमल रामटेके, देशकुमार खोब्रागडे आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular