Wednesday, February 18, 2026
HomeEducationalविद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षक उपलब्ध करुन द्या - खा. प्रतिभा धानोरकर

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षक उपलब्ध करुन द्या – खा. प्रतिभा धानोरकर

Provide teachers for students’ education – MP Pratibha Dhanorkar
Demand by letter to Zilla Parishad Chief Executive Officer.

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषद नेहरू उर्दू प्राथमिक शाळा येथे स्थायी शिक्षकांची नेमनुक करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

letter to Zilla Parishad Chief Executive Officer

महाराष्ट्र शासनाकडून अद्यापही शिक्षक भरती पुर्ण न केल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. परित्र पोर्टल द्वारे राबविण्यात आलेली शिक्षक भरती अद्यापही पुर्ण न झाल्याने अनेक शाळेत, अनेक माध्यमांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्याचसंदर्भात वरोरा येथील जिल्हा परिषद नेहरु उर्दु प्राथमिक शाळा येथे शिक्षकांची स्थायी पदे भरण्या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कडे निवेदन प्राप्त झाले होत.
त्या निवेदनाची दखल घेऊन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्या कडे तात्काळ शिक्षकांची पदे भरण्याची मागणी केली व त्यासंदर्भात भेट घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा अशा सुचना केल्या.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular