Saturday, April 20, 2024
HomePoliticalक्रीडा संकुलात अध्ययावत सुविधा उपलब्ध करा : आ. सुभाष धोटेंचे आढावा सभेत...

क्रीडा संकुलात अध्ययावत सुविधा उपलब्ध करा : आ. सुभाष धोटेंचे आढावा सभेत अधिकाऱ्यांना निर्देश.

Provide study facilities in Sports Complex : A.  Instructions to officials in Subhash Dhote’s review meeting.

चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी या तीनही तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल समितींची आढावा सभा विश्रामगृह राजुरा येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आ. धोटे यांनी तीनही तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल समिती अंतर्गत सुरू असलेले बांधकामे, क्रीडांगण परिसरातील निर्माण कार्ये, याबाबत येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला. या तीनही ठिकाणी आवश्यक सर्व अध्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करून खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देश दिले.

या प्रसंगी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड, गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकार, कोरपनाचे तहसीलदार एस. पी. व्हटकर, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, तालुका क्रीडा अधिकारी विजय डोबाळे, जयश्री देवकर, संदीप उईके, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, सहाय्यक अभियंता व्ही. व्ही. डाळ, एस. आर. जिवणे, ए. बी. सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular