Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomePoliticalउपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे किडणी डाॅयलेसिस यंत्र सुविधा उपलब्ध करा ; आमदार...

उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे किडणी डाॅयलेसिस यंत्र सुविधा उपलब्ध करा ; आमदार सुभाष धोटे यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी.

Provide kidney dialysis machine facility at Upazila Hospital Rajura
MLA Subhash Dhote’s request to the District Collector through a statement

चंद्रपूर :- राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील रूग्णांसाठी राजुरा येथे एकमेव १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय असुन रूग्णालयात विविध आजाराशी संबधित रूग्ण मोठ्या प्रमाणात येतात. सद्यपरिस्थितीत राजुरा परिसरात किडणी आजाराशी संबधित रूग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेले आहेत. मात्र येथे किडणी डाॅयलेसिस यंत्राची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे किडणी विकाराच्या रूग्णांची अंत्यत गैरसोय होत आहे. सुविधे अभावी अनेक रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात येते. मात्र जिल्हा सामान्य रूग्णालयात मोठ्या प्रमाणात रूग्णांची गर्दी असल्याने या आजारावरील रूग्णांना अनेक दिवस प्रतिक्षा करावी लागते. रूग्णावर वेळीच उपचार होत नसल्याने गंभीर रूग्णांना आपले जिव गमवावे लागत आहे. विषेश म्हणजे जिल्हा सामान्य रूग्णालयात किडणी डाॅयलेसिससाठी येणाऱ्या रूग्णांमध्ये राजुरा, कोरपना व जिवती या भागातील रूग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्षनास येते.

राजुरा परिसरातील किडणी आजाराशी संबधित रुग्णांची गंभीर समस्या लक्षात घेऊन प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत किंवा जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत उपजिल्हा रूग्णालय राजुरा येथे तातडीने किडणी डाॅयलेसिस यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष नियामक परिषद, जिल्हा खनिज प्रतिष्ठान, जिल्हा चंद्रपूर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular