Provide funds for the overall development of the Lok Sabha constituency.- MP Pratibha Dhanorkar
Met Roads and Highways Minister Nitin Gadkari in Delhi
चंद्रपूर :- चंद्रपूर- वणी -आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून काम करायला सुरुवात केली असून केंद्रातून क्षेत्राच्या विकासासाठी निधी आणण्याकरीता त्यांनी रस्ते मार्ग आणि महामार्ग मंत्री मा.श्री. नितीनजी गडकरी Central Minister Nitin Gadkari यांची दिल्ली येथे भेट घेतली.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्र हे बहुतांश आदिवासी बहुल असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश असणाऱ्या या लोकसभा क्षेत्रात रस्त्यांचा विकास व्हावा यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे मा.श्री. नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन रस्ते आणि महामार्ग संदर्भात निवेदन देऊन चर्चा केली.
यात प्रामुख्याने वरोरा-चिमुर प्रलंबित महामार्ग तात्काळ पुर्ण व्हावा याकरीता आपल्याकडून प्रयत्न केले जावे अशी विनंती देखील केली. तसेच चंद्रपूर जिल्हातील भद्रावती तालुक्यातील कोंढा-माजरी -पाटाळा -मणगांव-थोरा
यासंदर्भात मा.श्री. नितीनजी गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरोरा-चिमुर रस्त्याचे काम तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या. त्यासोबत वरील कामांकरीता निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील दिले.