Provide food grains/rations to ration card holders in Chandrapur city: Sharad Pawar Vichar Manch demands to district supply officers
चंद्रपूर :- शिधापत्रिका धारकांना शासन नियमानुसार अन्नधान्याचा लाभ मिळत नसून तो लाभ उपलब्ध करून द्यावा Ration card holder अश्या मागणीचे निवेदन शरद पवार विचार मंचच्या वतीने DSO चंद्रपूर जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करण्यात आले. Provide Ration
केंद्र सरकारच्या वतीने पुढील 5 वर्ष 80 करोड नागरिकांना अन्नधान्य/शिधा वाटप केले जाईल असे जाहीर केले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन जिल्हा चंद्रपूर तर्फे शहरातील नागरिकांना शिधापत्रिका योग्य शहानिशा करून वितरित केल्या आहेत.
मागील एक-दोन वर्षापासून शिधापत्रिका असून सुद्धा नागरिकांना त्यांच्या शिधापत्रिकेवर अजूनही अन्यधान्यचा लाभ मिळाला नाही. सदर राशनकार्डधारक नागरिकांचा समावेश प्राधान्य लाभार्थी कुटुंबात करण्यात आला नाही असे समजले आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांना अन्नधान्य पासून वंचित राहावे लागत आहे.
यासंबंधी गांभीर्याने लक्ष देवून ज्यांच्याकडे शासनाच्या नियमाप्रमाणे राशनकार्ड आहे अश्या नागरिकांचा समावेश प्राधान्य लाभार्थी कुटुंबात कुठलाही दूजाभाव न करता करावा आणि त्यांचा अन्नधान्य पुरवठा सुरळीत करावा अश्या मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर करण्यात आले. Sharad Pawar Thought Forum
जिल्हा पुरवठा अधिकारी District Supply Officer यांनी लवकरच नवीन कोठ्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करून चंद्रपूर शहरातील नागरीकांचा समावेश प्राधान्य लाभार्थी कुटुंबात करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. चारचाकी वाहनासह 5 लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त
निवेदन सादर करतांना शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष ॲड. निमेश मानकर, ॲड.सुहास झाडे, रेशनकार्ड धारक कवडूजी वैद्य, निलेश बोबडे यांची उपस्थिती होती.