Thursday, February 22, 2024
Homeउद्योगकृउबास' च्या प्रवेद्वारावर 'ही' संघटना करणार ठिय्या आंदोलन

कृउबास’ च्या प्रवेद्वारावर ‘ही’ संघटना करणार ठिय्या आंदोलन

protest will be held at Chandrapur Agricultural Produce Market Samiti’s vegetable yard premises

चंद्रपूर :- चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या Apmc Chandrapur भाजी यार्डमध्ये केवळ ठोक भाजी विकण्याची परवानगी दिली जाते. मात्र, येथील सर्वच व्यापाऱ्यांनी यार्डच्या आतील परिसरात ठोक विक्री बरोबरच किरकोळ भाजीपाला विक्री सुरू केल्याने, शहरातील हॉकर्स आणि गंजवार्डातील भाजी-बाजार प्रभावित होत आहे. परिणामी येथील विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली असून, कृउबासच्या भाजी यार्डमधील किरकोळ भाजीपाला विक्री विरोधात सोमवार १२ जानेवारी रोजी ठिय्या आंदोलन Stay Movement, Protest करण्याचा इशारा श्री महात्मा जोतिबा फुले भाजी विक्रेता उपबाजार संघटनेने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

येथील कृउबासच्या भाजीपाला यार्डमध्ये ६५ व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांकडून हातठेले धारक तसेच गंजवॉर्ड, बंगाली कॅम्प, तुकूम येथील किरकोळ व्यावसायिक ठोक भावात भाजीपाला खरेदी करून विकतात. मात्र, कोरोनाकाळापासून येथील व्यापाऱ्यांनी आणि दलालांनी भाजीपाला यार्डमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री सुरू केली आहे.

येथे स्वस्त भाजीपाला मिळत असल्याचा समज होत असल्याने अनेक ग्राहक येथून भाजीपाला खरेदी करतात. त्यामुळे या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी करून अन्य ठिकाणी विकणाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. अनेकदा खरेदी किमतही निघत नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर किरकोळ व्यावसायिकांवर वाढत आहे.

यापूर्वीही अनेकदा भाजीपाला यार्डमधील किरकोळ भाजीपाला विक्री बंद करण्याबाबत निवेदन कृउबासला दिले आहे. नोटीसही पाठविण्यात आली. मात्र, कृउबासच्या सचिवाकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. अनेकांना अनधिकृतपणे परवाने वितरित करण्यात आले आहे. कृउबास सचिवाच्या संगनमताने आणि आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडत असून, या विरोधात सोमवारी भाजी यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती हिमायू अली, शिल्पा कांबळे, उदय बुद्धावार यांनी दिली.

पत्रकार परिषदेला श्री महात्मा जोतिबा फुले भाजीविक्रेता उपबाजार संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम साखरकर, रुपेश देऊळकर, आमीर शेख, शैलेश खनके, शैलेश दानव, यासिर शेख, आशिष वासेकर, पुष्पा रामटेके, शाकीर खान, सामनाथ जाधव, लता धंदरे, शैलेश कर्णेवार, सचिन चहारे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular