Thursday, February 22, 2024
Homeखासदारखा.राहुल गांधी व कल्याण बॅनर्जीचा चंद्रपूरात निषेध ; भाजपाने केले आंदोलन

खा.राहुल गांधी व कल्याण बॅनर्जीचा चंद्रपूरात निषेध ; भाजपाने केले आंदोलन

Protest of Mp Rahul Gandhi and Kalyan Banerjee in Chandrapur;  BJP Agitation

चंद्रपूर :- संसद परिसरात टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची मिमिक्री अथवा नक्कल व खा.राहुल गांधींनी केलेले चित्रिकरण केल्याच्या घटनेचा भारतीय जनता पार्टी (महानगर व ग्रामीण)जिल्हा चंद्रपुरने   गुरुवारला निदर्शने करून निषेध नोंदविला.

यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, जिल्हाध्यक्ष (ग्रा.) हरीश शर्मा, भाजपा नेते डॉ.मंगेश गुलवाडे, राजू गोलिवार, तुषार सोम, सचिन कोतपल्लिवार, दिनकर सोमलकर, संदीपआगलावे, रवी लोणकर अजय सरकार, अंजली घोटेकर, शीतलआत्राम, विशाल निंबाळकर, संदीप आवारी, चांद सय्यद, सत्यम गाणार, राजेश यादव, सागर भगत, धम्मप्रकाश भस्मे, रुद्रनारायण तिवारी, अक्षय शेंडे, मनोज पोतराजे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी राहुल पावडे म्हणाले, लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांच्या दिव्यांगतेवर मिमिक्री करतात तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे त्याचे चित्रण करतात,हे कोणत्याही नेत्यासाठी अशोभनीय कृत्य आहे. भारतात उपराष्ट्रपतीसारखे घटनात्मक पद असलेल्या संसदेत असे घडणे दुदैवी आहे,असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular