Protest in front of Panchayat Samiti for Gharkul
They will protest till they don’t get the benefit of shelter
चंद्रपूर :- सावली तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामिण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जिबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुडा नागापूरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला. मात्र अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जिबगाव येथील सरपंच व सचिव यांनी संगणमताने आम्ही पात्र असतांना डाववले असुन अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत लाभार्थ्यांनी केला आहे.
अनेकदा प्रशासनाला याबाबतचे निवेदन देवूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी घरकुलासाठी पंचायत समितीसमोर कुटुंबासह ठिया आंदोलन करीत असल्याचे सांगितले आहे.
या आंदोलनात 8 व 6 वर्षाच्या मुलांचाही सहभाग असल्याचे दिसुन आले. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामिण भागातील गोरगरीब दारिद्रय रेषेखालील जनतेला हक्काचे घर असावे या उदात्त हेतुने शासनामार्फत मोदी आवास घरकुल योजना कार्यान्वीत करण्यात आली. त्यात विधवा, परितक्याय यासह ज्यांना निवारा नाही अशा लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने घरकुलाचा लाभ देण्याचे निकष आहे. मात्र जिबगाव येथील ग्रामपंचायतीने हेतुपुस्पर आम्हाला डावलून घरकुलाचा लाभ दिला नसल्याने आमच्यावर अन्याय झालेला आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही ठिया आंदोलन करीत असल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिल्या. आमची मागणी पुर्ण न झाल्यास यापुढे आंदोलन तिव्र करुन भिकमांगो, मुंडण व अर्धनग्न आंदोलन करुन प्रशासनाला जागे करणार अशी माहिती देण्यात आली.
यावेळी दिलीप अशोक पाल हे कुटुंबासह आंदोलनात सहभागी होते तर विलास नागापूरे, योगाजी कुडवे सामा. कार्यकर्ता, रविंद्र सेलोटे सामा. कार्यकर्ता, दुर्गा गेडाम आदी उपस्थित होते.
मोदी आवास योजनेअंतर्गत जिबगाव येथील 20 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. पुढील यादीमध्ये आंदोलनकर्त्या दोन्ही लाभार्थ्यांना प्राधान्यक्रमाने लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे.
जगन्नाथ तेलकापल्लीवार, सहा. गटविकास अधिकारी प.स. सावली