Prostitution in the name of Tours & Travels Office
चंद्रपूर :- शहरातील एका अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्ये ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या नावाने चालत असलेल्या कुंटनखान्यावर चंद्रपूर शहर पोलीसांनी धाड Police Raid टाकत दलालाला अटक करीत एका महिलेची सुटका करण्यात आली. Chandrapur Today Crime
शहरातील गंजवार्ड भागातील एका अपार्टमेंट मधील एका फ्लॅट मध्ये ट्रॅव्हल्स कार्यालय सुरु करण्यात आले. फ्लॅट मध्ये दररोज नवनवीन युवती व लोक येत असल्याने स्थानिक अपार्टमेंट मधील नागरिकांना संशय आल्याने, फ्लॅट मध्ये कुंटनखाना चालत असल्याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. Chandrapur City Police Station
शहर पोलिसांनी बुधवार दिनांक 29 मे रोजी रात्रौ सापळा रचून बनावटी ग्राहक पाठवून खात्री करीत धाड टाकली यात कुंटनखाना चालवीणारा दलाल प्रणय गेडाम याला ताब्यात घेण्यात आले तर यावेळी एक युवतीही आढळून आली, सदर युवती पश्चिम बंगाल राज्यातील असून तिची सुटका करण्यात आली. Sex Racket
अपार्टमेंट मधील फ्लॅट मध्ये कुंटनखाना मागील दीड महिन्यांपासून सुरु असल्याची चर्चा आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे.