program of the Laughter Yoga Group on the occasion of World AIDS Day
चंद्रपूर :- १ डिसेंबर जागतिक एड्स डे निम्मित आझाद गार्डन चंद्रपूर येथील हास्ययोगा परिवाराने एड्स जनजागृती वर आज चर्चासत्र घेतले. एड्स डे हा गुलाबी रंगाच्या फितीने दर्शविला जातो, या सन्मानार्थ हास्य योग चे सर्व सभासदांनी गुलाबी रंगाच्या कपडे परिधान केले होते.
श्री. कमलसिंह कछ्वाह अध्यक्ष हास्य योग परीवार चंद्रपूर हे मागील २७ वर्षापासून आझाद गार्डन येथे हास्य योग चालवीत आहेत. यात युवक वर्गापासून तर वयोवृद्ध अस्या १०० च्या अधिक सभासद सामील आहेत.
आज घेतलेल्या चर्चासत्रात डॉ सिराज खान हे प्रमुख अतिथी होते. डॉ खान यांनी मार्गदर्शनात सांगितले की एड्स चा प्रसार कसा होतो हे आपल्याला माहिती आहे. पण एड्स या जीवघेण्या आजाराच्या पेशंट ला समाज दूर करतो. त्यासाठी आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की एड्स कसा पसरत नाही. एड्स च्या पेशंट ला समाजाने स्वीकारून त्यांच्या मनात एक सकारात्मक भावना तयार करणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे.
या कार्यक्रमास हास्य योग चे सर्व सभासद उपस्थित होते. कार्यक्रम अंती ६ डिसेंबर ला ब्लड फॉर बाबासाब या हस्टाग अंतर्गत सर्वांना रक्तदानाचे महत्व सांगून रक्तदानाचे आव्हान केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंगेश खोब्रागडे यांनी केले तसेच अमृता गावंडे यांनी आभार प्रदर्शन केले.