Prof. Dnyanesh Vakudkar in Chekdarur for MLA Subhash Dhote’s campaign
चंद्रपूर :- सामाजिक कार्यकर्ते, प्रबोधनकार, साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर Pro. Dnyanesh Wakudkar यांची महाविकास आघाडी समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाषभाऊ धोटे Subhash Dhote यांच्या प्रचारार्थ प्रबोधनात्मक मार्गदर्शन सभेचे आयोजन आज दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोज शुक्रवारला गोंडपिपरी तालुक्यातील मौजा चेकदरूर येथे सायंकाळी ६ : ३० वाजता करण्यात आले आहे.
या प्रबोधनात्मक मार्गदर्शन सभेला गोंडपिपरी तालुक्यातील, चेकदरूर तथा परिसरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.