Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्र राज्यवर्गणी गोळा करण्यापूर्वी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

वर्गणी गोळा करण्यापूर्वी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक

Prior permission of the Assistant Charity Commissioner is required before collection of subscriptions                                                     चंद्रपूर :- जिल्ह्यातील सर्व दुर्गा उत्सव आणि शारदा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळातर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाकरीता (सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था वगळून इतरांना) रोख रकमेच्या किंवा वस्तूच्या स्वरूपात कोणताही पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा करण्याकरीता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41-क नुसार सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. त्याकरीता www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करावा.सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडून ऑनलाईन परवानगी व प्रमाणपत्र देण्यात येईल. Prior permission of the Assistant Charity Commissioner is required before collection of subscriptions

◆ अर्जासोबत दाखल करावयाच्या आवश्यक कागदपत्रांचा तपशिल

अर्ज पूर्णपणे भरलेला असावा. सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेल्या ठरावाची प्रत आवश्यक आहे. सर्व सदस्यांचे ओळखपत्र, जागेबाबत जमीन मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, नगरसेवक, सरपंच किंवा प्रतिष्ठित व्यक्ती यांचे शिफारसपत्र, विद्युत बिलाची प्रत, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र, मागील वर्षाच्या परवानगीची प्रत तसेच मागील वर्षाचा जमाखर्चाचा हिशोब आदी कागदपत्रे अर्जासोबत दाखल करणे आवश्यक आहे.

कलम 41- क च्या तरतुदीचे उल्लंघन करून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची परवानगी न घेता पैसा, वर्गणी किंवा देणगी गोळा केल्यास व तसा दोषसिद्ध झाल्यास, तीन महिन्यापर्यंत साध्या कारावासाची किंवा संकलित रकमेच्या किंवा अंशदानाच्या दीडपटीपर्यंत द्रव्य दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील. त्यामुळे सर्व मंडळांनी वर्गणी गोळा करण्यापूर्वी रीतसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त प्रियंका करवंदे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular