Sunday, April 21, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनभाऊंच्या दांडियात 'नच बलिये' फेम प्रिन्स नरुलानी जिंकली चंद्रपूरकरांची मने

भाऊंच्या दांडियात ‘नच बलिये’ फेम प्रिन्स नरुलानी जिंकली चंद्रपूरकरांची मने

Prince Narulani of ‘Nach Baliye’ fame won the hearts of Chandrapurkar in Bhau’s Dandiya चंद्रपूर :- येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षीपासून “भाऊचा दांडिया” महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर Balu bhau Dhanorkar मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी भाऊचा दांडिया उत्सवाला दांडियाप्रेमी युवक, युवतींसह महिला, पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शनिवारी नच बलिये, बिग बॉस फेम अभिनेता प्रिन्स नरुला यांनी विशेष उपस्थिती लावली. यावेळी युथ आयकॉन असलेल्या प्रिन्स नरुलाची एक झलक टिपण्यासाठी चंद्रपूरकर तरुण, तरुणींनी मैदानावर एकच गर्दी केली. 

येथील चांदा क्लब ग्राउंडवर मागील वर्षांपासून भरविण्यात येत असलेल्या भाऊचा दांडिया उत्सवाला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. १७ ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आह. दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी नच बलिये तसेच रोडीज एक्स २, बिगबॉस ९ चा विजेचा प्रिन्स नरुला याने हजेरी लावली. यावेळी त्याला पाहण्यासाठी चंद्रपूरकर युवक, युवतींनी मैदानावर मोदी गर्दी केली. त्याची एक झलक कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मैदानावरील युवतींमध्ये चुरस बघायला मिळाली. आमदार प्रतिभा धानोरकर Mla Pratibha Dhanorkar यांच्या हस्ते प्रिन्स नरुला याचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी चंद्रपूरकरांशी संवाद साधत त्यांची मने जिंकली. २२ ऑक्टोबर रोजी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत प्रथमेश परब यांची उपस्थिती राहणार आहे. Prince Narulani of ‘Nach Baliye’ fame won the hearts of Chandrapurkar in Bhau’s Dandiya

२४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या दांडिया उत्सवात स्पर्धकांना अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी असून, लाखोंची बक्षिसे ठेवण्यात आली आहे

याप्रांगी माजी आमदार देवराव भांडेकर, माजी आमदार सुदर्शन निमकर, डॉ. विश्वास झाडे, ऍड. विजय मोगरे, वारजूरकर, आदी मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular