Pratibha Dhanorkar took the oath of MP as a witness to the constitution
चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसह भारतात सर्वच ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक पार पडून खासदार म्हणून अनेक पक्षाचे नेते निवडून आले. त्यात कॉग्रेसच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार म्हणून प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar निवडून आल्या. त्यांनी आज संसदेच्या नविन इमारतीत आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदी प्रतिभा धानोरकर ह्या भरघोस मतांनी निवडून आल्या. त्यांनी जनतेच्या अनेक कामांना सुरुवात देखील केली. त्यांच्या कार्याची खरी सुरुवात आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 13 मिनीटांनी शपथ घेऊन झाली. निवडणूकी दरम्यान देखील संविधान वाचविण्याची शपथ घेणाऱ्या धानोरकर यांनी नविन संसद भवनात नतमस्तक होऊन प्रवेश केला व आपल्या पदाची शपथ घेऊन जह हिंद जय संविधान चा नारा देऊन आपली लढाई हि लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी असेल असे देखील सांगितले. Pratibha Dhanorkar took the oath of MP as a witness to the constitution
संसद भवनाच्या नविन इमारतीत आज अनेक खासदारांनी आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील मराठी भाषेतून शपथ घेऊन मराठा भाषेचा सन्मान जागविला. भविष्यात संविधानाच्या रक्षणासाठी संसदेत आवाज बुलंद करणार असून आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी पुनःश्च एकदा जनतेचे आभार मानून मी माझ्या नव्या राजकीय जीवनाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले.