Monday, November 4, 2024
HomeEducationalप्रगती पॅनलचा ऐतिहासिक विजय
spot_img
spot_img

प्रगती पॅनलचा ऐतिहासिक विजय

Pragati panel’s historic victory, transformation panel’s defeat
Chandrapur Taluka Primary Teachers Cooperative Credit Institution Election

चंद्रपूर :- चंद्रपूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेच्या संचालकपदाची पंचवार्षिक निवडणूक रविवार (21 जुलै) ला बहुजन हिताय सभागृह,तुकुम येथे पार पडली. या निवडणुकीत प्रगती पॅनलचे सर्व (11) उमेदवार विजयी झाल्याने परिवर्तन पॅनलचा पुरता धुव्वा उडाला आहे. प्रगती पॅनलच्या एकीच्या बाळाची चर्चा आता शिक्षकवर्गात होत आहे.

प्रगती पॅनलने विविध संवर्गातून 11 उमेदवार उभे करून प्रस्थपित परिवर्तन पॅनल समोर मोठे आव्हान उभे केले होते.निवडणुकीत 164 मतदारांपैकी 158 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 6 च्या सुमारास निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला.यात प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.यात सर्वसाधारण गटातून गजानन मरापे 91, प्रवीण नवले 93, पुरुषोत्तम तायडे यांना 103, प्रमोद उरकुडे 94, रवींद्र वाक्कर 96 मते घेऊन विजयी झाले. तर महिला राखीव गटातून पुष्पा आळे100, श्रद्धा भुसारी (विघ्नेश्वर) 97 मते घेऊन विजय मिळविला. इतर मागासवर्ग गटातून सदन मुनगेलवार यांचे सह इतर राखीव गटातून पुष्पलता दरेकर, अनिल आवळे यांनी विजय मिळविला. प्रगती पॅनलच्या ऐतिहासिक विजयाची चर्चा आता होत आहे. Chandrapur Taluka Primary Teachers Cooperative Credit Institution Election

प्रगती पॅनलला 10 शिक्षक संघटनांचा पाठिंबा

परिवर्तन पॅनलला मात देण्यासाठी प्रगती पॅनलच्या उमेदवारांना 10 शिक्षक संघटनांनी कंबर कसली होती. यात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, अखिल संघ महिला मंच, म.रा.प्राथमिक शिक्षक संघ, म.रा.केंद्र प्रमुख संघटना, ओबीसी कर्मचारी असोसिएशन,ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल, सेवानिवृत्त प्रा.शिक्षक संघटना, उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ व म.रा.पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघाचा समावेश आहे.

निवडणूक चिन्हाचीही चर्चा

प्रगती पॅनलने विमान हे चिन्ह घेतले तर परिवर्तन पॅनलने कपबशी चिन्ह विजयासाठी निवडले होते. परिवर्तन पॅनलचा कोणताही उमेदवार विजयी होऊ शकला नाही, त्यामुळे आता प्रगती पॅनलचे विमान उंच उडाल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular