Police raid on Chunala and Kitali gambling dens Appeal to the Chandrapur police
चंद्रपुर :- जिल्हयात विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवेद्य धंदयावर रेड Police Raid करणेबाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा LCB चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली शाखेचे पथकांना आदेशीत केले होते. Chandrapur Today Crime
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी शाखेचे पथकांना चंद्रपूर जिल्हयात सुरू असलेल्या अवैध धंदयावर छापे टाकून समूड नष्ट करण्याकरीता निर्देश दिले होते.
त्याअनुषंगाने दिनांक 22 जुलै 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा चे अधिकारी व कर्मचारी यांनी पो. स्टे. राजूरा हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना माहिती मिळाली की, मौजा चुनाळा येथील झुडपी जंगलात पडित रेल्वे क्कार्टर जवळ एमरजन्सी लाईटच्या उजेडात काही इसम सार्वजनिक ठिकाणी तास पत्यावर पैश्याची बाजी लावून हारजितचा जुगार खेळ खेळीत आहेत.
अशा माहिती वरून सदर ठिकाणी जावून छापा टाकून रेड केला असता 3 इसम जागीच आढळून आले व इतर 8 इसम हे रात्रौ अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.
मिळून आलेल्या इसमाकडून जुगाराचे नगदी रूपये 2,33,800 रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल, तास पत्ते, 7 मोटार सायकली असा एकूण 6,80,200 रुपयांचा मुद्देमाल कार्यवाही करून जप्त करीत जुगार कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कर्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनी मनोज गदादे, विकास गायकवाड, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, नापोशी. गणेश मोहुर्ले, पोशि. मिनींद जांभूळे यांनी केली आहे. व पुढील तपास पो. स्टे. राजुरा हे करीत आहे.
तसेच याआधी सुध्दा दि. 21 जुलै 2024 रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत मौजा किटाळी शेत शिवारात अवैद्य तास पत्ता जुगारावर पोलीस निरिक्षक लता वाढिवे, पो. स्टे. दुर्गापूर, पो. स्टॉप दुर्गापूर यांनी किटाळी येथील अवैद्य तास पत्ता जुगारावर छापा टाकून रेड केला असता 4 इसम मिळून आले. त्यांचे कडून जुगाराचे नगदी रूपये व जुगाराचे साहित्य, मोटार सायकली असा एकूण 4,46,060 /- रू. चा माल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी विरूध्द जुगार कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले. Durgapur Police Station
यापुढे कोणीही अवैद्य जुगार, अवैध व्यवसाय करीत असल्यास त्याची माहिती पोलीसांना देण्यात यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.