Police constable commits suicide in Rajura
चंद्रपूर :- राजूरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई श्रीमंत कदम यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
राजूरा पोलीस स्टेशन येथील पोलीस शिपाई श्रीमंत कदम वय 34 वर्ष यांनी राहत असलेल्या किरायचे घरी आत्महत्या केली.
कदम यांना पत्नी व 1 वर्षाची एक मुलगी असा परिवार आहे. श्रीमंत कदम यांना दारूचे अतीव्यसन जडल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच राजूरा पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे.
आत्महत्येचे नेमके कारण काय याचा पुढील तपास राजूरा पोलीस करीत आहेत.