Thursday, March 5, 2026
HomeJobचंद्रपूर जिल्हा पोलीस भरती

चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती

Chandrapur District Police Recruitment: 100 meter run retest on February 22

चंद्रपूर :- जिल्हा पोलीस भरती २०२४-२५ अंतर्गत दिनांक ११ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी संदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संबंधित कालावधीत मैदानी चाचणी दिलेल्या आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी फक्त १०० मीटर धावण्याची पुनर्चाचणी रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. Chandrapur District Police Recruitment 2024-25

ही पुनर्चाचणी पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, तुकूम, चंद्रपूर येथे होणार असून, संबंधित सर्व उमेदवारांनी सकाळी ५.०० वाजण्यापूर्वी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 100 meter run retest on February 22

आक्षेपांनंतर भरती मंडळाचा निर्णय
११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान पार पडलेल्या मैदानी चाचणी प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून प्राप्त आक्षेप भरती मंडळ निर्णय समितीसमोर ठेवण्यात आले होते. सर्वानुमते झालेल्या चर्चेनंतर पात्र उमेदवारांना १०० मीटर धावण्याची एकदाच पुनःसंधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गैरहजर राहिल्यास पूर्वीचेच गुण ग्राह्य
२२ फेब्रुवारी रोजी कोणतेही कारण न देता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांची कोणतीही तक्रार नाही असे गृहीत धरून, त्यांना पूर्वी (११ ते १४ फेब्रुवारीदरम्यान) १०० मीटर धावण्यात मिळालेले गुणच अंतिम मानले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष बाबींसाठी पर्यायी दिनांक
ज्या उमेदवारांची त्याच दिवशी इतरत्र पोलीस भरतीची मैदानी/लेखी परीक्षा नियोजित असेल किंवा वैद्यकीय कारणास्तव उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी संबंधित कागदपत्रे सादर करावीत. अशा प्रकरणांमध्ये भरती मंडळ योग्य तो निर्णय घेऊन पुढील दिनांक देण्याबाबत विचार करणार आहे.

आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत
या निर्णयाबाबत उमेदवारांना काही म्हणणे किंवा आक्षेप मांडावयाचे असल्यास त्यांनी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत

खालीलप्रमाणे संपर्क साधावा :
प्रत्यक्ष लेखी स्वरूपात
ई-मेल : sp.chandrapur@mahapolice.gov.in
दूरध्वनी : ७८८७८९०१००

जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व संबंधित उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करून उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular