Pitline facility adds importance to Ballarshah – Hansraj Ahir
Long distance trains will start soon
◆ बल्लारपूर व चंद्रपूर येथे रेल्वे गाडीचे जल्लोषात स्वागत
चंद्रपूर :- बल्लारपूर येथे बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेन (क्रमांक २२१०९/२२११०) ला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हिरवी झेंडी दाखवली.
दि. १३ मार्च रोजी या कार्यक्रमप्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की बल्लारशाहमध्ये ११ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या पिटलाइनच्या सुविधेमुळे आता रेल्वे प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.
यासंदर्भात बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेन आज सुरु करण्यात आली आहे. बल्लाशाह रेल्वे स्थानकाचे महत्व पिटलाईनमुळे वाढले आहे. अहीर पुढे म्हणाले की, पूर्वी सहा डब्यांची आरक्षण असलेली सेवाग्राम लिंक एक्सप्रेस येथे धावत असे. लिंक एक्सप्रेस गाड्या आता संपुर्ण भारतात बंद करण्यात आल्या आहेत म्हणुन ही गाडी सुरू करण्यात आली आहे.
लवकरच नंदीग्राम ही ट्रेन दररोज धावणार आहे. तसेच आता पुण्यासाठीची ट्रेन आठवड्यातुन तीन दिवस धावणार असून, ती येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होईल. माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चंद्रपूर आणि बल्लारशाहसाठी रेल्वेच्या अनेक सुविधा दिल्या आहेत, असेही अहीर म्हणाले.
उल्लेखनीय बाब अशी की, एलटीटी-बल्लारशाह सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक ०११२७/०११२८) या गाडीला पूर्वी विशेष दर्जा होता, या ट्रेनचे भाडे प्रवाशांना परवडणारे नव्हते. विशेष दर्जा असल्याने ही ट्रेन नेहमीच उशिराने धावत असे. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन हंसराज अहीर यांनी या ट्रेनचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. आता ही ट्रेन नव्या क्रमांकाने धावत असून, आता या ट्रेनच्या भाड्यातही ३० टक्के कपात करण्यात आली आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर ट्रेन चंद्रपूर रेल्वेस्थानकावर पोहचताच भाजप कार्यकर्त्यांनी या ट्रेनचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिलाध्यक्ष हरीश शर्मा, विजय राऊत, खुशाल बोंडे, रेल आधिकारी, एडीआरएम पी एस खेरकर, एसीएम एच के बेहरा, दामोदर मंत्री, लखन सिंह चंदेल, अनिल फुलझले, चंद्रपुर जिल्हा रेलवे यात्री एसोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास सूंचूवार, रघुवीर अहीर, अरुण मस्की, राजु घरोटे, विनोद शेरकी, रेणुका दूधे, वैशाली जोशी, जयश्री मोहुर्ले, स्वामी रायबरम, देवेंद्र वाटकर, कांता ढोके, किशोर मोहुर्ले, आरती आक्केवार, हनुमानसिंह खेंगर, रामेश्वर पासवान, जुम्मन शेख, ममता बोज्जा, गुलशन खान, गुलशन शर्मा, विकास राजुरकर, ज्ञानेंद्र आर्य, गणेश सैदाने व रेलवे कर्मचारी कृष्णकुमार सेन, एम वेंकटेश्वरलू, जी राजूरकर, रविंद्र नंदनवार, रवी मिश्रा, योगेश बविस्कर, आरपीएफ चे निरीक्षक श्री पाठक आदी उपस्थित होते.
चंद्रपूर स्थानकावर या ट्रेनचे स्वागत रेल्वे संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण, विनोद बजाज, नरेंद्र सोनी, प्रदीप माहेश्वरी, डॉ. भुपेश भलमे, डॉ. अशोक रोहरा, मिलींद दाभेरे, संजय मंथाने, अशोक बोथरा, नरेश लेकवानी, भाजपचे विठ्ठल डुकरे, मायाताई उईके, वंदना संतोषवार, प्रदीप किरमे, राजेंद्र तिवारी, अविनाश राखुंडे, प्रमोद शास्त्रकार, बि.बि. सिंह, शालु कन्नोजवार, राजेंद्र कागदेलवार, संजय खनके, मधुकर राउत, सुरेश यादव, मयुर भोकरे, प्रणय डंभारे, बाळा चंदनखेडे, चेतन शर्मा, पराग मलोडे, रेणुकाताई घोडेस्वार, किशोर बंडावार, नरेंद्र गुजराथी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.