Pistol and live cartridges seized in Chandrapur district
Action by local crime branch
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी विशेष मोहीम राबवित असतांना स्थानिक गुन्हे शाखेने LCB अवैध्यरित्या पिस्तूल व एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास आरोपीला भद्रावती तालुक्यातील पाटाळा गावातील राष्ट्रीय महामार्गवरील उड्डाणंपुलाखालून अटक करण्यात आली, यावेळी आरोपी जवळून एक गावठी बनावटी पिस्तूल, एक जिवंत काडतूस व जुनी वापरती होंडा सिटी कार असा एकूण 2,25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Pistol and live cartridges seized
पोलीस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैदयरित्या अग्नीशस्त्र बाळगाणा-यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले. Chandrapur Crime
स्थागुशा चंद्रपुर चे पो. नि. महेश कोंडावार यांनी पथके नेमुण त्यांना अवैध शस्त्र बाळगाणा-याची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली. सदर मोहीमे दरम्यान पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, मौजा पाटाळा ता. भद्रावती जि. चंद्रपुर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलीया खाली एक इसम आपल्या सोबत पिस्टल बाळगुन कथ्या रंगाच्या होंडा सिटी चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. 02 ए. एल. 8052 मध्ये बसुन आहे.
सदर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर इसमास ताब्यात घेवुन सदर इसमाच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या थैलीची तपासणी केली असता, त्यामध्ये एक गावठी बनावटी पिस्टल व त्यात वापरण्यात येणारे एक नग जिवंत काडतुस आढळून आले. सदर इसमास त्याचे नाव विचारून त्याचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता त्याचेवर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर इसमा विरुदध पोलीस स्टेशन माजरी येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदया अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी मो. जमील अयनुल हक शेख, वय 22 वर्ष, रा. राजुर कॉलनी, वणी जि. यवतमाळ यास अटक करण्यात आली.
आरोपी कडून एक गावठी बनावटी पिस्टल किमंत 25,000 रुपये, एक नग जिवंत काडतुस किमंत 500 रुपये आणी जुनी वापरती होंडा सिटी चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. 02 ए. एल. 8052 किमंत 2,00,000 रू असा एकुण 2,25,500 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोहवा स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, सतिश अवथरे, पोशि प्रशांत नागोसे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.