Sunday, April 21, 2024
Homeआमदारजनतेचे आशिर्वाद, कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी ताकद - आमदार सुभाष धोटे ;...

जनतेचे आशिर्वाद, कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी ताकद – आमदार सुभाष धोटे ; अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त क्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन ; अनाथ विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, खाद्यान्न किट, बधिरांना श्रवणयंत्रांचे वितरण

People’s blessings, workers’ love is my strength – MLA Subhash Dhote;  Organizing various events in the field on the occasion of birthday celebrations;  Distribution of school bags, food kits to orphan students, hearing aids to the deaf                                                                         चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इन्फंट जीजस सोसायटीच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा, अनाथ विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, खाद्यान्न किट, बधिर व्यक्तींना श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात आले, तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर येथे सर्व रोग निदान व उपचार शिबिर, जनसंपर्क कार्यालय येथे नेते, कार्यकर्त्ये, नागरिकांशी संवाद, मौजा पाटण, तालुका जिवती येथे अभीष्टचिंतन सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आ. धोटे यांनी वैयक्तिक अधिक्षक डॉ. डाकोडे आणि सर्व डाँक्टरांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणुन घेतल्या. रक्तदान शिबिरात अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त विविध माण्यवरांनी आ. धोटे यांना वृक्षांची रोपटे, पुष्पगुच्छ, कलाकृती व शुभेच्छा देऊन त्यांना सुदृढ व दिर्घ आयुष्य लाभो अशा शुभकामना दिल्या.

People’s blessings, workers’ love is my strength – MLA Subhash Dhote;  Organizing various events in the field on the occasion of birthday celebrations;  Distribution of school bags, food kits to orphan students, hearing aids to the deaf


या प्रसंगी अभिष्टचिंतन सोहळ्यात मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, जनतेचे आशिर्वाद, कार्यकर्त्यांचे प्रेम हीच माझी ताकद असून सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात सर्वसामान्यांची सेवा करण्यात आपण सदैव तत्पर आहेत. येणाऱ्या काळात पक्षश्रेष्ठी, काँग्रेस कार्यकर्ते आणि जनता जनार्धन जी जबाबदारी सोपवतील ती उत्तमपणे पार पाडण्यासाठी पुर्ण क्षमतेने काम करणार असे मत व्यक्त केले.

People’s blessings, workers’ love is my strength – MLA Subhash Dhote;  Organizing various events in the field on the occasion of birthday celebrations;  Distribution of school bags, food kits to orphan students, hearing aids to the deaf

याप्रसंगी राजुरा येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, सुभाष गोर, नंदू नागरकर, दादा पाटील लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, अॅड. सदानंद लांडे, हमीदभाई, अशोकराव देशपांडे, अॅड. अरूण धोटे, सुनिल देशपांडे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, निर्मला कुळमेथे, विकास देवाडकर, स्वप्नील दंतुलवार, प्राचार्य संभाजी वरकड, अभिजीत धोटे, यु. काँ. चे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कुंदाताई जेणेकर, नंदकिशोर वाढई, साईनाथ बत्कमवार, गोपाल मुंदडा, शंकर गोनेलवार, संतोष गटलेवार, संध्या चांदेकर, प्रभाकर येरणे, आनंद दासरी, गजानन भटारकर, संतोष इंदुरवार, देविदास सातपुते, निलेश संगमवार, एजाज अहमद, धनराज चिंचोलकर, अशोक राव, रामेश्वर ढवस, इर्षाद शेख, जगदीश बुटले, कोमल फुसाटे, सुरेश पावडे, यासह काँग्रेसचे अनेक जि. प. सदस्य, प. स. सदस्य, न. प. सदस्य, कृ. उ. बा. स. संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इन्फंट जीजस सोसायटी अंतर्गत सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular