Pay EPF of petrol, diesel pump employees, Demand of Safed Flag Labor Union to Chandrapur district collector
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल व डिझेल पंपावर कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात पंप मालकांनी ई पी एफ (EPF) जमा करण्यात यावे जेणेकरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेळी एकरकमी लाभ मिळावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सफेद झेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांच्या वतीने करण्यात आले. Pay EPF of petrol, diesel pump employees
चंद्रपूर जिल्ह्य़ातील भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, व इतर सर्व पेट्रोल पंपवरील कार्यरत असलेले कर्मचारी यांना पेट्रोल पंप मालक थातूर – मातुर पगार देऊन त्या गोरगरीब कर्मचाऱ्यांवरती अन्याय करतात.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही 1952 मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याचा मालक आस्थापनातील दरमहा मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. जेणेकरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्ती समयी एक रकमी लाभ मिळावा. Employee Providend Fund
परंतु पेट्रोल पंप मालक कर्मचाऱ्यांना देण्यात येणार्या मासिक वेतनातून भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ) कपात करत नाही आणि भरत सुध्दा नाही.
आज दिनांक 27 मे 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली की लवकरात लवकर या सर्व पेट्रोल पंप कर्मचार्यांचा EPF कपात करून त्यांचा PF खात्यात जमा करावा. Demand of Safed Jhenda Labor Union to Chandrapur district collector
चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व पेट्रोल व डिझेल वितरण कंपनी आस्थापना यांना कामगार भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात यावी
असे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.