Saturday, January 18, 2025
HomeAccidentअपघाती मृत्यू झालेल्याच्या वारसांना १ कोटी २३ लाख देण्याचा कोर्टाचा विमा कंपनीला...

अपघाती मृत्यू झालेल्याच्या वारसांना १ कोटी २३ लाख देण्याचा कोर्टाचा विमा कंपनीला आदेश

The court ordered the insurance company to pay 1 crore to the heirs of the accident victims

चंद्रपूर :- आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने मृतकाचे वारसानां 1 कोटी 23 लाख 7 हजार रूपये 6 टक्के व्याजासह देण्याचा आदेश जिल्हा न्यायाधिश 3 चंद्रपूर यांनी पारीत केला.

मृतक मोनल विलास बानकर, वय 39 वर्षे रा. राजुरा या पोलीस स्टेशन, बल्लारपूर येथे ‘पोलीस शिपाई’ या पदावर कार्यरत होत्या. दिनांक 3/6/2022 रोजी कर्तव्यावरून राजूरा येथे परत येत असतांना ट्रक क.MH-29-BE-4148 चे चालकाने त्याचे वाहन हयगईने व निष्काळजीपणे चालवून त्यांला धडक दिली. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यु झाला.

त्याबद्दल मृतकाचे वारसांनी आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड इन्शुरन्स कंपनीचे विरूध्द नूकसान भरपाई करीता चंद्रपूर न्यायालयात दावा दाखल केला होता.

सदर दाव्यात दोन्ही पक्षाची बाजू ऐकून जिल्हा न्यायाधिश – 3 चंद्रपूर श्री.पि.जी. भोसले साहेब यांनी दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी आदेश पारीत करून सदर विमा कंपनीने नुकसान भरपाई पोटी मृतकाचे वारसानांना 1 कोटी 23 लाख 7 हजार रूपये द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला.

मृतकांचे वारसांतर्फे ॲड. जगजीवन इंगोले यांनी तर विमा कंपनीतर्फे ॲड. विनय लिंगे यांनी बाजु मांडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular