Paving the way for the new court building of Ballarpur
चंद्रपूर :- ‘दिला शब्द केला पूर्ण’ यासाठी सुपरिचित असलेले आ. श्री. सुधीर मुनगंटीवार MLA Sudhir Mungantiwar यांनी पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारपूरच्या नवीन न्यायालयीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपये निधीची राज्यसरकारने मान्यता दिली आहे. एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात आ.सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. Paving the way for the new court building of Ballarpur
बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. ही नवीन न्यायालयीन इमारत बल्लारपूरच्या वैभवात भर पाडणारी असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या इमारतीमध्ये तळमजला, त्यावर तीन मजले, पाच कोर्ट हॉलचा समावेश असेल. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, वातानुकुलित व्यवस्था, लिफ्ट, पाणीपुरवठा, जलसंचय आदींचा समावेश असणार आहे.
बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत व्हावी, येथे अद्ययावत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, सुसज्ज अशा कोर्टरुम असाव्यात, यासाठी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्यांनी नियमित पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. MLA Sudhir Mungantiwar’s pursuit is a big success
न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाईल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.