Participation of Dr. Ashok Jeevtode in Gaon Chalo Abhiyan; Spontaneous response of citizens
चंद्रपूर :- भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महानगर पालिका अंतर्गत वडगाव प्रभाग व सिव्हील लाईन परिसरात गाव चलो, बूथ चलो अभियान राबविण्यात आले. यावेळी नागरिकांना राज्य व केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समजावून सांगण्यात आल्या.
या अभियानात अंत्योदय योजना, सशक्त शेतकरी समृध्द भारत, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, राष्ट्र प्रथम, सशक्त भारत, पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, आरोग्यम धनसंपदा, महिला शक्ति नवी गती, राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक न्याय, कृषी कल्याण, गडकिल्ल्यांचे व तीर्थ क्षेत्रांचे संवर्धन आदी योजनांची माहिती देण्यात आली.

या विविध योजनांचे जे लाभार्थी झालेले नसेल अशा नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे.
यावेळी मनोहर गाठे, सचिन दिघाडे, प्रवीण दिघाडे, नितीन कुकडे, प्रकाश गाठे, शामराव बदकुलवार, मधुकर हिरादेवे, सतीश शाहू, सतीश बिजेवार, गोपाळ वाटेकर, दादा दहेकर, प्रवीण साखरकर, रवि जोगी, महेश यार्दी, जितेंद्र केराम, सुखलाल चुधरी, आदी व परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.