Panchnama of damaged crops in the district and give immediate help to the affected farmers
चंद्रपूर :- जिल्ह्यातील काही तालुक्यात शनिवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.या नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दया या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँगेस शरदचंद्र पवार गटाच्या NCP Sharadchandra Pawar जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले.
10 फेब्रुवारी रोजी वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, पोभूर्णl या तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट तर ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा, कोरपना, मुल व इतर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे हरभरा, गहू , तुर ,ज्वारी, जवस, मुंग, उडीद , रब्बी पीक जवळपास पूर्ण उध्वस्त झाले.भाजीपाला व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी तरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळेल. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीपणे उभे राहू असे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपास्थित जिल्हा सरचिटणीस सरस्वती गावंडे , जिल्हा सचिव निर्मला नरवडे,जिल्हा सहसचिव शोभा घरडे, माधुरी पांडे, रेशमा मेश्राम, शालिनी वैद्य, अर्चना मडावी, प्रमीला पाठक, व अन्य महीला उपस्थित होत्या.